स्थैर्य, वावरहिरे, दि.७: बहुजन हिताय हे ब्रीद घेवुन ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेल्या लालपरीची चाके अजुनही ग्रामीण भागात धावु न शकल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना लालपरीची प्रतिक्षा करावी लागत आहे. कोरोना संसर्ग वाढु लागल्याने मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लाॅकडावुननंतर लालपरीची चाके जाग्यावर थांबली.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन जाहिर करण्यासह विविध उपाययोजना करत राज्यात परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती.तेव्हा पासुन थांबलेली चाके तब्बल सहा सात महिने जागेवरच अाहेत.शासनाने आता अनलाॅक करित बंद ठेवण्यात अालेल्या सुविधा हळुहळु सुरु केल्या अाहेत.राज्य परिवहन मंडळाने आपली बससेवा शहरी भागात सुरु केली परंतु ग्रामीण भागात अद्याप सुरु केलेली नाही. जेष्ठ नागरिक, अबालवृद्ध यांना लालपरीची प्रकर्षाने जाणीव होत आहे.ग्रामीण भागातील बससेवा सुरु नसल्याने नागरिकांना अवैध वाहतुकीवर अवलंबुन रहावे लागत अाहे तसेच दवाखाना,कार्यालयीन कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी येजा करण्यासाठी खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत अाहेत.सध्या सणासुधीचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील बस सेवा सुरु करण्याची मागणी जोर धरु लागले आहे.