दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२४ | सातारा |
कृषी विभाग सातारा यांच्यावतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे औचित्य साधून फलटण, जिल्हा सातारा येथे शेतकर्यांना विविध योजनेची माहिती देणारे चित्ररथ व दिंडीच्या माध्यमातून योजनेचा शेतकर्यांमध्ये जनजागृती उपक्रम घेण्यात आला.
फलटण कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वडजलपासून फलटण कृषी कार्यालयापर्यंत टाळमृदुंगाच्या गजरात दिंडी काढली. या दिंडीमध्ये पाणी वाचवण्याचा संदेश घेऊन सहभागी असलेले विठ्ठल-रुक्मिणी लोकांचे खास आकर्षण ठरले.
या दिंडीला शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कृषी विभागाच्या या अनोख्या जनजागृती कृषी योजना माहिती जनजागृती दिंडीमध्ये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे व उपविभागीय कृषी अधिकारी फलटण सुहास रणसिंग व दत्तात्रय गायकवाड तसेच मंडल कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांच्या वतीने राजगिरा लाडू वाटप करण्यात आले.