दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२४ | फलटण |
प. पू. गोविंद महाराज उपळेकर यांच्या ५० व्या पुण्यतिथी सोहळ्याचा उद्या, मंगळवार दि. २४ सप्टेंबर २०२४ मुख्य दिवस आहे.
मुख्य दिवसाचा कार्यक्रम असा :
- सकाळी ५.०० ते ७.०० : काकडा, अभिषेक पूजा, आरती. इ.
- सकाळी ७.०० ते ९.०० : लघुरुद्र
- सकाळी ९.०० ते ९.३० : श्री गीता पठण, पसायदान व श्री ज्ञानेश्वरी पारायण सांगता
- सकाळी ९.३० ते १२.१५ : सौ. मिताली कातरणीकर – प्रभुणे, मुंबई यांचे भक्तीगीत गायन, तबला – अनिकेत देशपांडे, हार्मोनियम – नेरकर सर
- दुपारी १२.१५ वा. : ‘श्रीं’ची माध्यान्ह आरती
- दुपारी १२.३० ते ३.०० : महाप्रसाद
- दुपारी ४.०० ते ६.०० : ह.भ.प. कमलाकर महाराज भादोले, निमसोड (खटाव) यांचे फुलांचे किर्तन
- सायं. ६.१० वा. : ‘श्रीं’चे फुलांचा कार्यक्रम व पालखी सोहळा (नगर प्रदक्षिणा)
- सायं. ७.०० वा. : ‘श्रीं’ची आरती
- रात्री ९.३० वा. : ‘श्रीं’चा हरिपाठ
या सर्व कार्यक्रमांसाठी भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था फलटणचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.