गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी साथ द्यावी; संजय कामठे, सौ.रेश्मा देशमुख, सौ.रुपाली चव्हाण यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोळकी दि. ८ : ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून कोळकी गावाचा विकास प्रगतीपथावर आहे. हे कार्य असेच अखंड चालू राहण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीतील प्रभाग क्रमांक ३ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कामठे, सौ.रेश्मा देशमुख व सौ.रुपाली चव्हाण यांनी मतदारांना केले आहे.

कोळकी ग्रामपंचायतीसाठी दि.१५ जानेवारी रोजी मतदान होणार असून या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांच्या मतदारांशी प्रत्यक्ष गाठी – भेटी सुरु झाल्या आहेत. त्याप्रसंगी संजय कामठे, सौ.रेश्मा देशमुख, सौ.रुपाली चव्हाण बोलत होते.

कोळकी गावाचा झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र असे असताना गावातील प्रत्येक ग्रामस्थाला आवश्यक सोयी – सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आजवर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केले आहे. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या कुशल नेतृत्त्वामुळे गावाचा विकास प्रगतीपथावर आहे. स्वच्छ पाणी पुरवठा, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, बंदिस्त गटारे, बागबगिचे, मंदिरे अशा सार्वजनिक ठिकाणांचा विस्तार व सुशोभीकरण यामध्ये कोळकी ग्रामपंचायत अग्रेसर ठरली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळातही आपल्या कोळकी गावात सोयी-सुविधांमध्ये आणखीन वाढ होण्यासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असेही आवाहन संजय कामठे, सौ.रेश्मा देशमुख व सौ.रुपाली चव्हाण हे मतदारांना करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!