विठोबा मराठी साहित्याचा खरा अलंकार

दुधेबावीत ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025। फलटण । लोकसाहित्याच्या चळवळीतील अस्सल कोहिनूर हिरा खंडोबाने झपाटलेला विठोबा हा खरा मराठी साहित्याचा अलंकार आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी केळे यांनी केले. ते दुधेबावी (ता. फलटण) येथे डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये बोलत होते.

डॉ. केळे पुढे म्हणाले, कुलदैवत खंडोबाचे संशोधन करून नव्या पिढीसमोर एक संशोधक दृष्टी निर्माण करणारा साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती होती. समाजातील वंचित लोककलावंतांना त्यांच्या नावे पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येणार आहे असे संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी केळे यांनी जाहीर केले.

प्रा. रवींद्र कोकरे म्हणाले, लोकसाहित्य हाच खरा साहित्याचा आत्मा असून दरवर्षी उपेक्षीत वंचित पण लोककलेची सेवा करणार्‍या लोककलावंताचा सन्मान करणे हा संमेलनाचा उद्देश आहे.

बा. ग. केसकर म्हणाले, भटक्या विमुक्त समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन साहित्य सेवा करावी. यावेळी येथील वृक्षमित्र सचिन सोनवलकर यांना वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ह. भ. प. नवनाथ महाराज कोलवडकर (दालवडी) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

दुपारच्या सत्रामध्ये कवि संमेलनाचे आयोजन केले होते. हनुमंत चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात विक्रम गायकवाड, प्रमोद जगताप, प्रा. मुकुंद वलेकर, अविनाश चव्हाण, प्रकाश सकुंडे, युवराज खलाटे, शुभांगी सोनवलकर, आशाताई दळवी, मनीषा मिसाळ, राहुल निकम, महोसीन आतार, ज. तु. गार्डी, बाबा लोंढे, सागर कराडे, आकाश आढाव, प्रतीक्षा आढाव, विद्या शेळके हे कवी सहभागी झाले होते.

त्यानंतर परिसंवाद लोकसाहित्याचे योगदान या विषयावर प्रवीण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली वक्ते एम. डी. दडस, आम्रपाली कोकरे, प्रा राजेंद्र आगवणे, गोपाळ सरक या साहित्यिकांनी आपली मते मांडली.

यावेळी मारुतराव वाघमोडे, राजेंद्र बरकडे, दिनकरराव सोनवलकर, शंकर शिंगाडे, कुमार देवकाते, जयवंत तांबे, हनुमंतराव सोनवलकर, अनिल कोकरे, सुभाष बोंद्रे, आकाश मुंडे, दिलीप कोकरे, सोमनाथ लोखंडे, पिंटू ठोंबरे, बापूराव झंजे, विकास सोनवलकर, प्रकाश सस्ते, विठ्ठल पडर आदी मान्यवर उपस्थित होते. शशिकांत सोनवलकर सूत्रसंचालन यांनी केले. सचिन लोखंडे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!