स्थैर्य, फलटण : सातारा जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाअधिकारी मनिषा ओव्हाळ यांनी टाकळवाडे ता.फलटण ग्रामपंचायतीस भेट देउन ग्रामपंचायत कामकाज व चालू असलेल्या विविध विकासकामांबद्दल माहिती घेतली. मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड केलेल्या कडूनिंब, करंज, वड, पिंपळ, रेनट्री, निलगिरी, आपटा, नानदूर्ग, नारळ, शेवगा, चिंच, बोर इत्यादी झाडांची पाहणी करुन झाडांचे संगोपण व लागवड मनरेगा अंतर्गत चांगल्या प्रकारे केल्याने गामपंचायत व ग्रामस्थांची अभिनंदन केले. तसेच स्माशनभुमी, स्वस्तधान्य दुकान, दप्तर तपासणी केली.
यावेळी यावेळी गटविकासअधिकारी सौ. अस्मिता गावडे,नायब तहसिलदार आर. सी. पाटील, सरपंच सौ. रेखा नानासो इवरे, शिक्षण समिती अध्यक्ष नानासो इवरे, उपसरपंच राहूल फुले, माजी सरपंच सौ. रुपाली डांबे, माजी उपसरपंच युवराज मुळीक, विकास सोसायटीचे उपसभापती दिपक फुले, सदस्य नंदकुमार डांबे, सौ. विमल इवरे, ग्रामसेवक संदिप एखंडे, तालुका पुरवठा अधिकारी काकडे, तसेच कल्याण इवरे, विकास इवरे, अजित इवरे, संपत मिड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.