अप्पर जिल्हाधिकारी मनीषा ओव्हाळ यांची हणमंतवाडीस भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : सातारा जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाअधिकारी मनिषा ओव्हाळ यांनी हणमंतवाडी ता.फलटण ग्रामपंचायतीस भेट देउन देशातील पहिला एकत्रित घरकुल प्रकल्प, जिल्हा परिषद शाळा , ग्रामपंचायत कार्यालय इतर शासकीय कार्यालये बिहार पॅटर्न वृक्षलागवड, जलसंधारण ओढा खोलीकरण रुंदीकरण बंधारे बांधकाम, रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण कृषी महिला सक्षमीकरण नरेगा अंतर्गत झालेली कामे अशा विविध योजना विषयाची झालेली कामे आणि गावात राबविल्या जाणाऱ्या भविष्यातील योजना मनरेगा अंतर्गत चांगल्या प्रकारे केल्याने गामपंचायत व ग्रामस्थांची अभिनंदन केले. तसेच स्माशनभुमी, स्वस्तधान्य दुकान, दप्तर तपासणी केली.

यावेळी यावेळी गटविकासअधिकारी सौ. अस्मिता गावडे,नायब तहसिलदार आर. सी. पाटील, सरपंच विक्रमसिंह जाधव, मंडलाधिकारी देवकाते, तलाठी गायकवाड, ग्रामसेविका सौ.  गपाट, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पवार, ग्रामपाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष संदिप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे, हणमंत साठे, राजेंद्र शिंदे,  सोसायटीचे संचालक राजकुमार साबळे, धनाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सागर शिंदे, पांडुरंग धाईजे, विकास निकाळजे, महेश येडवे व ग्रामस्थ गणेश चव्हाण, महादेव बहिरमल, हरीचंद्र लोंढे व इतर ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हणमंत पवार दगडू पवार नवनाथ मसुगडे संतोष सुळ आदी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!