दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । सातारा । सातारा नगरपालिकेच्या प्रभाग रचना संदर्भात जी गोपनीयता बाळगायची आहे त्याचा सातारा नगर पालिका प्रशासन व मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून गोपनीयता भंग झाल्याची तक्रार मंगळवार पेठ येथील रहिवासी हरी रामदास शिवशरण यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रकाद्वारे केली आहे या गोपनीयता भंगाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे
यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीचा मध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की कोणत्याही शहराची प्रभागरचना निश्चित करताना प्रथम प्रगणक गटनिहाय नकाशा मागवून गुगल मॅप द्वारे त्याच्या हद्द निश्चित केल्या जातात आणि मग चतु : सीमांची माहिती घेऊन प्रभागाच सीमा अंतिम केल्या जातात ्याला जिल्हाधिकार्यांची मान्यता घेण्यात येते
मात्र प्रत्यक्षात सातारा शहराची वाढ रचना करताना मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या गोपनीयतेचा भंग झालेला आहे संबंधित प्रभाग रचना ही सोशल मीडियावर व्हायरल झाली असून सातारा शहरातील अनेकांच्या व्हाट्सअप ला ती उपलब्ध आहे म्हणजेच निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून प्रशासक या नात्याने परस्पर परस्पर प्रभाग रचना करण्यात आल्याचे तक्रार शिवशरण यांनी केली आहे तसेच तुम्ही तयारीला लागा असेही संदेश देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे या संदर्भात स्वायत्त यंत्रणेमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असा तक्रार मंगळवार पेठेतून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेला आहे या तक्रार त्यामुळे सातारा शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे