स्थैर्य, सातारा, दि. ३०: कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवसायासाठी निर्बंध घालूनही वेळेनंतर हॉटेल उघडे ठेवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसात आशियाई महामार्गावरील पाच हॉटेल्सवर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे १२.१५ च्या सुमारास बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना महामार्गावर जिल्हाधिकाऱ्यानी विहित केलेल्या वेळेनंतरही महामार्गावरील हॉटेल्स उघडी असल्याचे निदर्शनास आले.यावेळी पोलिसांनी भरतगाव गावच्या हद्दीतील हॉटेल राजधानी पेलेसचे चालक अमित बजरंग कदम (रा.शेंद्रे,ता.सातारा),बोरगाव (ता.सातारा) येथील हॉटेल साईराज चे मालक आधिकराव विठ्ठल महाडिक(रा.खिंडवाडी, ता सातारा),अतीत (ता.सातारा)गावच्या हद्दीतील हॉटेल निसर्गचे चालक प्रशांत मोहनराव पवार (रा.अतीत, ता.सातारा), येथीलच हॉटेल विश्वजितचे विशाल विलास यादव व अरुण बाळको यादव( दोघे रा.पाडळी, ता.सातारा) व काशीळ (ता.सातारा) येथील हॉटेल रॉयल रेस्टोचे चालक निजाम आजम शेख (रा.काशीळ,ता.सातारा)यांच्याविरुद्ध भा.दं. वि.स कलम १८८,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र कोव्हिडं विनियमन कलम ११ व साथरोग प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.सपोनि डॉ.सागर वाघ,पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,हवालदार विशाल कदम,विजय साळुंखे,सत्यम थोरात,सिध्दनाथ शेडगे,उत्तम गायकवाड व सहा होमगार्ड यांनी ही कारवाई केली.