दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । श्रीवर्धन । कव्वालीसम्राट नवनीत खरे यांचे शिष्य ख्यातनाम कवी, गायक, सम्यक कोकण कला मंचचे आधारस्तंभ आणि माजी सचिव मंदार कवाडे यांच्या मातोश्री आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या विमला दाजी कवाडे यांचे वयाच्या ८४व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या अंत्ययात्रेस तालुक्यातील सर्व स्तरातील मान्यवर, सम्यक कोकण कला मंचचे कलावंत व सर्वसामान्य लोकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
दिवंगत विमला कवाडे या स्वभावाने प्रेमळ व मनमिळावू, सोज्वळ व सर्वसमावेशक, स्वाभिमानी होत्या, त्यांच्यामागे मंदार, अशोक, अजित, दशरथ तसेच मुलगी प्रतिभा साळवी, सुना वर्षा, सरिता, ज्योती, सुचिता नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
दिवंगत विमला कवाडे या निष्ठावंत, इमानदार कार्यकर्त्या आपल्यातून निघून गेल्याने समाजातील सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचा पुण्यानुमोदन विधी, चैत्य स्मारकाचे अनावरण व श्रद्धांजली सभा कार्यक्रम १० जुलै २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता मु.पो. दांडगुरी, ता. श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे बौद्धजन पंचायत समितीच्या अधिपत्याखाली तसेच मा. आनंद चाफेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे योजिले आहे यासोबतच मा. गजानन करमरकर यांच्या हस्ते चैत्य स्मारकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून दिवंगत विमला दाजी कवाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी असे आव्हान बौद्धजन पंचायत समितीद्वारे करण्यात आले आहे.