दि.29 रोजी गावनिहाय सरपंच आरक्षण निश्‍चिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.२४ : सातारा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार फलटण तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण वाटप नुकतेच दि.21 रोजी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार तहसिलदार, फलटण यांचे मार्फत गावनिहाय आरक्षण निश्‍चिती शुक्रवार, दि.29 रोजी सकाळी 11 वाजता येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधक्ष सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे, अशी माहिती फलटणचे तहसिलदार समीर यादव यांनी दिली.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 – 2021 हा टप्पा पार पडल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दि.21 रोजीच्या आदेशान्वये सातारा जिल्ह्यातील 1495 ग्रामपंचायतींसाठी 2020 – 2025 या कालावधीत होणार्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाचे तालुकानिहाय वाटप केले आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील एकूण 131 ग्रामपंचायतीचे आरक्षण वाटप करण्यात आले असून अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 19, महिला 10, खुला 9, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1,  सोडती द्वारे 1 पद निश्‍चित करणे. नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  35, महिला 18, खुला 17, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 76, महिला 38, खुला 38, एकुण सरपंचांची  पदे 131 आहेत. यानुसार आता दि.29 रोजी गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्‍चित करण्यात येणार आहे.

Back to top button
Don`t copy text!