फलटण तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीचे गाव कारभारी ठरले; ८ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण असलेला उमेदवार नसल्याने रिक्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २४ : फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचातीच्या निवडणूक नुकत्याच संपन्न झाल्या. त्या नंतर सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार समीर यादव यांनी जाहीर केले परंतु मुंबई उच्च न्यायालय येथे सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीवर याचिका दाखल करण्यात आलेली होती. मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांना आक्षेप असलेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीवर योग्य तो तोडगा काढून निर्णय घेण्यास सांगितले. त्या नंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण जिल्ह्यातील तालुका निहाय आक्षेप असलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणावर सुनावणी घेतली व जिथे ज्या प्रवर्गाच्या उमेदवार सदस्य म्हणून निवडून आलेला नाही. तिथे उपसरपंच यांनी निवड करून तहसीलदार यांनी त्या बाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात यावे असे आदेश पारित केले. त्या नंतर रखडलेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवड कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

डोंबाळवाडी, शेरेशिंदेवादी, घाडगेवाडी, धुमाळवाडी, मुळीकवाडी, फरांदवाडी, घाडगेमळा, तावडी या ८ ग्रामपंचायत सरपंच पदे नियोजित आरक्षण असलेला उमेदवार नसल्याने रिक्त राहिली आहेत, मात्र तेथे उपसरपंच निवड करण्यात आली आहे.

त्या नुसार फलटण तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पुढीलप्रमाणे –

४० ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच पदावर खालील सदस्यांची निवड झाली आहे. – (अनुक्रमे सरपंच/उपसरपंच) पिंपळवाडी – रेखा संजय जाधव, अक्षय किरण रुपनवर, तांबवे – नीलम विशाल गायकवाड, महेंद्र आबासाहेब शिंदे, कोळकी – विजया संदीप नाळे, संजय बबन कामटे, पिराचीवाडी – दीपक भगवान सावंत, सोनाली रमेश सावंत, खुंटे – प्रियांका विलास काळे, रुपाली नंदकुमार खलाटे, भिलकटी – सविता उत्तम पवार, निलेश बबन गोरे, जाधववाडी (फ) – सीमा आबाजी गायकवाड, नयन निलेश जगदाळे, अलगुडेवाडी – मंगल संभाजी शिंदे, मिलींद दादासाहेब बोरावके, सोनवडी खु|| – शालन लालासाहेब सुर्यवंशी, शरद अरविंद सोनवलकर, तिरकवाडी – पूजा अजित पवार, नानासाहेब अंकुश काळुखे, सासकल – उषाताई राजेंद्र फुले, नितीन धनाजी घोरपडे, डोंबाळवाडी – रिक्त, राणी विकास डोंबाळे, शेरेशिंदेवाडी – रिक्त, विमल धनंजय चव्हाण, सस्तेवाडी – ज्ञानेश्वरी राजेंद्र कदम, बापूराव सदाशिव शिरतोडे, घाडगेवाडी – रिक्त, दादासाहेब रावसाहेब बोबडे, कापडगाव – मयुरी विशाल खताळ, दशरथ सदाशिव खताळ, निरगुडी – राजेंद्र मधुकर सस्ते, रमेश मोतीलाल निकाळजे, रावडी बु|| – आरती नानासाहेब सुळ, अनिल शिवाजी बोबडे, वाघोशी – ताराचंद उत्तम पवार, लक्ष्मण मारुती जाधव, जिंती – शीतल वाल्मिक रणवरे, दादासाहेब भीमराव रणवरे, कापशी – संजय सदाशिव गार्डी, पूनम सुशांत राशीनकर, धुमाळवाडी – रिक्त, योगेश राजाराम कदम, मुळीकवाडी – रिक्त, गणेश दिलीप कदम, काशीदवाडी – स्वाती रमेश अनपट, कमल अशोक केंगार, फरांदवाडी – रिक्त, दुर्योधन सोमनाथ ननावरे, घाडगेमळा – रिक्त, संतोष मल्हारी जगताप, कुरवली बु|| – राणी अनंतकुमार सुळ, महेश सुरेश पवार, शिंदेनगर – मदन उत्तम निंबाळकर, छाया सतीश भिसे, ठाकुरकी – रामदास दादू शिंदे, छाया बाळू बोडरे, नांदल – वृषाली नितीन कोळेकर, ठकाताई तानाजी कोळेकर, सरडे – पूनम मारुती चव्हाण, महादेव आबा वीरकर, सांगवी – संतोष लव्हा मोरे, उर्मिला सुरेश जगताप, राजुरी – सचिन आबासाहेब पवार, सुनीता अंकुश गावडे, तावडी – रिक्त, दत्तात्रय हणमंत निंबाळकर, जावली – ज्ञानेश्वरी सचिन मकर, बाळू गुंडा ठोंबरे, खामगाव – माधुरी प्रदीप जाडकर, प्रकाश विनायक पवार, हिंगणगाव – हेमा योगेश भोईटे, शिवाजी मारुती भोईटे, मुंजवडी – स्वाती कुंडलिक कदम, अर्चना विशाल रणदिवे, साठे – शर्मिला मनोहर माने, आण्णा आबाजी मिंड, खराडेवाडी – कुसुम गणपत खराडे, समीर राजुमिया पठाण.


Back to top button
Don`t copy text!