दैनिक स्थैर्य | दि. २५ नोव्हेंबर २०२३ | फलटण | भारत सरकारतर्फे आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यात या यात्रेचे आयोजन केले आहे. त्यानुसार फलटण तालुयातील यात्रेचा शुभारंभ झाला असून २३ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ पर्यंत ही यात्रा फलटण तालुयात आयोजित केली असल्याची माहिती फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी दिली.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ फलटण तालुक्यात पहिल्या टप्प्यात २३ नोव्हेंबर २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ पर्यंत १५ दिवस चालणार आहे. या यात्रेंतर्गत पात्र लाभार्थी निवडणे व माहितीचा प्रचार, प्रसार करणे, नागरिकांशी संवाद व अनुभव कथन, सरकारी योजनेसाठी संभाव्य लाभार्थी निवड करणेसह आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीन दयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, प्रधानमंत्री पोषण अभियान, जल जीवन मिशन – हर घर जल, स्वामित्व योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री प्रणाम योजना, अतिसूक्ष्म खतांचा शेतीसाठी वापर, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) इ. योजना खालील विविध विभागांमार्फत राबविण्यात येणार आहेत.
यात्रेदरम्यान महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा अग्रणी बँका, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पशूसंवर्धन विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पेन्शनसह इतर विभागांची माहिती नागरिकांना मिळणार आहे.
यावेळी लाभार्थी निवड करण्यात येणार असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
संकल्प यात्रेचा दिनांक व ग्रामपंचायत निहाय नियोजन पुढीलप्रमाणे :
- २८.११.२०२३ – राजाळे – स. ९.००
- २८.११.२०२३ – धूळदेव – दु. १.००
- २९.११.२०२३ – तरडगाव – स. ९.००
- २९.११.२०२३ – साखरवाडी – दु. १.००
- ३०.११.२०२३ – सोनगाव – स. ९.००
- ३०.११.२०२३ – साठे – दु. १.००
- ०१.१२.२०२३ – खटकेवस्ती – स. ९.००
- ०१.१२.२०२३ – आसू – दु. १.००
- ०४.१२.२०२३ – ढवळेवाडी आ. – स. ९.००
- ०४.१२.२०२३ – पवारवाडी – दु. १.००
- ०५.१२.२०२३ – हणमंतवाडी – स. ९.००
- ०५.१२.२०२३ – पिंपरद – दु. १.००
- ०६.१२.२०२३ – मठाचीवाडी – स. ९.००
- ०६.१२.२०२३ – निंबळक – दु. १.००
- ०७.१२.२०२३ – नाईकबोमवाडी – स. ९.००
- ०७.१२.२०२३ – गुणवरे – दु. १.००
- ०८.१२.२०२३ – बरड – स. ९.००
- ०८.१२.२०२३ – राजुरी – दु. १.००
- ११.१२.२०२३ – आंदरूड – स. ९.००
- ११.१२.२०२३ – मिरढे – दु. १.००
- १२.१२.२०२३ – वडले – स. ९.००
- १२.१२.२०२३ – तिरकवाडी – दु. १.००
- १३.१२.२०२३ – कोळकी – स. ९.००
- १३.१२.२०२३ – ठाकुरकी – दु. १.००
- १४.१२.२०२३ – झिरपवाडी – स. ९.००
- १४.१२.२०२३ – दुधेबावी – दु. १.००
- १५.१२.२०२३ – गिरवी – स. ९.००
- १५.१२.२०२३ – निरगुडी – दु. १.००
दरम्यान, या संकल्प यात्रेतील योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या गावच्या ग्रामसेवक व तलाठी किंवा सर्कल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी केले आहे.