पाटील गटाला 2 जागांवर यश तर राजे गटाचे 7 उमेदवार विजयी; आता साखरवाडीचा सरपंच ‘पाटील गट’ ठरवणार ?
स्थैर्य, वृत्तसेवा दि.18 : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष लक्ष घातलेल्या साखरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणूकीत विक्रम भोसले यांच्या पॅनेलने राजे गटाला जबरदस्त फाईट देत 17 पैकी 8 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे तर राजे गटाला 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे 2 जागांवर पाटील गटाचे उमेदवार निवडून आल्याने 17 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत या 2 उमेदवारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून गावचा सरपंच आता ‘पाटील गट’च ठरवणार, असे चित्र निर्माण झाले आहे.
नुकताच तालुक्यातील निवडणूकीचा आढावा एका वार्तापत्राद्वारे ‘स्थैर्य’ ने एका प्रसिद्ध केला होता. त्यात साखरवाडीत पाटील गटाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे भाकीत ‘स्थैर्य’ ने केले होते. ते तंतोतंत खरे ठरल्याचे या निकालावरुन स्पष्ट होत आहे.
दरम्यान, विक्रम भोसले हे स्वत: 2 प्रभागातून निवडून आले असल्याने त्यांना एका ठिकाणाहून राजीनामा द्यावा लागणार असून त्या ठिकाणी आगामी काळात पुन्हा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आत्ताच्या निकालानंतरही साखरवाडी ग्रामपंचायतीत सरपंच पदावरुन चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे.
साखरवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी उमेदवार खालील प्रमाणे –
प्रभाग क्रमांक 1 –
1) हरिष कमलाकर गायकवाड (राजे गट)
2) दत्तात्रय उद्धव वाघ (राजे गट)
3) गौरीदेवी राजेंद्र माडकर (राजे गट)
प्रभाग क्रमांक 2 –
1) मयुर राजकुमार लोखंडे (विक्रम भोसले गट)
2) विक्रमसिंह पांडुरंग भोसले (विक्रम भोसले गट)
3) सुष्मा सुरज गाडे (विक्रम भोसले गट)
प्रभाग क्रमांक 3 –
1) विक्रमसिंह पांडुरंग भोसले (विक्रम भोसले गट)
2) गौरी संग्राम औचरे (विक्रम भोसले गट)
प्रभाग क्रमांक 4 –
1) विक्रम बबनराव ढेंबरे (विक्रम भोसले गट)
2) रेखा संजय जाधव (विक्रम भोसले गट)
3) किर्ती सचिन भोसले (विक्रम भोसले गट)
प्रभाग क्रमांक 5 –
1) अक्षय किरण रुपनवर (पाटील गट)
2) विद्या विलास भोसले (राजे गट)
3) सुनंदा तुकाराम पवार (राजे गट)
प्रभाग क्रमांक 6 –
1) मच्छींद्र बापुराव भोसले (राजे गट)
2) लक्ष्मी उर्फ मनिषा अंकुश माने (राजे गट)
3) अपर्णा दत्तात्रय बोडरे (पाटील गट)