अखेर विजयदादांनी व्हील चेअर सोडली; आता दादा चालू लागले


दैनिक स्थैर्य | दि. 19 जुलै 2024 | निंबळक | सोलापुर जिल्ह्याचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील हे गेली काही वर्षे व्हील चेअर वर बसून आपला सर्व दिनक्रम करीत होते. त्यानंतर माढा लोकसभेचा प्रचार सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील यांनी संपूर्ण व्हील चेअर वर बसूनच केला होता. माढा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर विजयदादा यांनी व्हील चेअर सोडत आता चालू लागले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांना ऊर्जा प्राप्त झाली असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

मोहिते पाटील आपल्या बंगल्या मध्ये पाय घसरुन पडल्याने त्यांच्या मणक्याला मार लागला होता. त्यानंतर मोहिते पाटील काही दिवस मुंबई येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.

त्यानंतरचा मोहिते पाटील यांचा दिनक्रम व्हिलचेअर वरच सुरु होता. काहि महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सुध्दा मोहिते पाटील यांनी अशा अवस्थेत माढा आणि सोलापुर जिल्हयात झंझावत करुन दोन्ही उमेदवार निवडुण आणले. ८० व्या वर्षी सुध्दा आत्ता मोहिते पाटील स्वतःच्या पायावर चालु लागल्याने विधासभेला विरोधकांना पळावणार अशी चर्चा सोलापुर जिल्हयात सुरु झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!