विजयसिंह मोहिते – पाटलांच्या हस्ते फलटणमध्ये प्रचाराचा शुभारंभ संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. 23 एप्रिल 2024 | फलटण | ४३ माढा लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या शुभहस्ते श्रीराम मंदिर, फलटण येथे श्रीफळ वाढवून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शेकाप, आप या पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून माढा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रचार शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून समारंभपूर्वक करण्यात आला असून कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. प्रियायालक्षमीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प आघाडीचे प्रमुख विश्वतेज रणजितसिंह मोहिते – पाटील, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन महादेवराव पवार तथा आबा, मुंबई व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन डॉ. विजयराव बोरावके, सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे चेअरमन तेजसिंह दिलीपसिंह भोसले, ॲड. नरेंद्र तथा राजू कृष्णचंद्र भोईटे, श्रीराम एज्युकेशन सोसायटी मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके, पंकज पवार शहर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस फलटण, शिवसेना सातारा जिल्हाध्यक्ष संजय भोसले, फलटण तालुकाध्यक्ष विकास नाळे, आपचे तालुकाध्यक्ष अनिकेत नाळे, धैर्यशील लोखंडे, वीरसेन सोनवणे. दलित पँथर फलटणचे रोहित अहिवळे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!