विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयामध्ये १२ दिवसीय कार्पोरेट मेंटॉरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १७ मे २०२३ । बारामती । विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे तृतीय व चतुर्थ वर्ष अभियांत्रिकी  शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी  VIOSA, मुंबई या नामांकित कंपनीचा कार्पोरेट मेन्टेरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम  महाविद्यालयात  १७ एप्रिल २०२३ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत संपन्न झाला. या कार्यशाळेत सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हि कार्यशाळा महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी व अंतर्गत कौशल्य  वाढीसाठी आयोजित आकारण्यात आली होती. या कार्यशाळॆत विविध ट्रेनिंगमध्ये AI-Based रिझ्युम बिल्डिंग, मॉक इंटरव्यूव टेक्निक्स, कार्पोरेट स्किल, सॉफ्ट स्किलस, कम्युनिकेशन स्किल, लाईफ स्किल इ. विषयावर इंडस्ट्री मधील मधील अनुभवी तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांची प्रोफेशनल करियर टेस्ट घेण्यात आली. या टेस्टच्या आधारावर विद्यार्थ्यांना करियर निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. VIOSA च्या मार्फत विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्किल्स साठी डुओलीन्गो सॉफ्टवेअर, रिझ्युम व मॉक इंटरव्यूवसाठी AI-Based सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. भविष्यातील करियर व आयुष्यातील महत्वाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या ट्रेनिंगचा महत्वाचा वाटा राहणार आहे अशी प्रतिक्रिया  विद्यार्थ्यांनी या ट्रेनिंग नंतर दिली. या कार्यक्रमाची सांगता सेंट्रल टीपीओ प्रा. विशाल कोरे  यांच्या करियर बाबत बहुमोल मार्गदर्शनाने व ट्रेनिंग चे  सर्टिफिकेट वाटप करून झाली.
विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी व जास्तीत जास्त प्लेसमेंट देण्यासाठी महाविद्यालय कटीबद्ध आहे अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर व अभियांत्रिकीचे  टीपीओ प्रा. सुरज कुंभार यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक, चारुदत्त दाते, वैभव भोसले, संतोष मोरे, मंगेश खंडाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेन्ट विभागाने विद्यार्थ्यांसाठी हा प्रक्षिणाचा जो उपक्रम हाती घेतला त्या बद्दल संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष श्री. अशोक प्रभुणे, सचिव निलीमाताई गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. श्री. राजीव शहा, श्री. मंदार सिकची, श्री. किरण गुजर, रजिस्टार श्री. श्रीश कंभोज या सर्व मान्यवरांनी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

Back to top button
Don`t copy text!