दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
भारत निवडणूक आयोगाने दि. १५/१०/२०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांकरिता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ३० ते ३९ वयोगटात सर्वाधिक ७०१९६ मतदार असल्याची माहिती फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम असा :
- निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक : दिनांक २२/१०/२०२४ (मंगळवार)
- नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक : दिनांक २९/१०/२०२४ (मंगळवार)
- नामनिर्देशनपत्रांची छाननी : दिनांक ३०/१०/२०२४ (बुधवार)
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक : दिनांक ०४/११/२०२४ (सोमवार)
- मतदानाचा दिनांक : दिनांक २०/११/२०२४ (बुधवार)
- मतमोजणीचा दिनांक : दिनांक २३/११/२०२४ (शनिवार)
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक : दिनांक २५/११/२०२४ (सोमवार)
त्याअनुषंगाने २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघाची माहिती पुढीलप्रमाणे :