तर मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते राहतील सभागृहाबाहेर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 28 : 60 वर्षांच्या वरील आमदारांना अधिवेशनात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय झालेला नाही. तो विचार सुरू असेल पण जर 60 वर्षांपुढील आमदारांना अधिवेशनात प्रवेश नसेल तर अनेक ज्येष्ठ नेत्यांना सभागृहात येता येणार नाही. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील आहेत. इतकंच काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 27 जुलै रोजी 60 वर्षांचे झाले आहेत. अजित पवार 61 वर्षांचे आहेत. सुभाष देसाई 78 वर्षांचे आहेत. अनिल देशमुख, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे देखील 60 च्या वर आहेत. त्या मुळे सदरील निर्णय घेतला जाईल का ? नाही या बाबत बरेच तर्क वितर्क राजकीय वर्तुळात वर्तवले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!