दैनिक स्थैर्य । दि.०६ फेब्रुवारी २०२२ । सातारा । ट्रक चालविण्यास दिल्यानंतर फसवणूक करणाऱ्या दोघांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहने चालविण्यास घेवून परस्पर विक्री करणाऱ्या दोघांनी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही ट्रक व्यवसायिक, ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना फसविललेले असल्याची माहिती समोर आलेली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाणेचे हददीमधील इंडो स्टार कॅपिटल फायनान्स शाखा सातारा येथून सचिन बजरंग चव्हाण (रा. एकंबे, ता. कोरेगाव जि. सातारा) यांनी एक दहा टायरी ट्रक फायनान्सकडून कर्जाने घेतला होता. सदर ट्रकचे हप्ते थकित राहिलेने फायनान्स कंपनीचे एजंटचे ओळखीने सदर ट्रक हा उन्मेश उल्हास शिर्के (रा. निरा ता. पुरंदर जि. सातारा) यास थकित हप्ते भरून ठराविक रक्कम देवून ट्रक चालविण्यास दिला होता. सदर ट्रकचे हप्ते थकित राहू लागल्याने सदर ट्रक मालकाने संबंधितास हप्ते भरण्याबाबत सांगितले. परंतू त्यास वारंवार टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे येवू लागल्याने तसेच पैसे भरत नाही व ट्रक देखील देत नाही. अशी दमबाजी करू लागल्याने आपली फसवणूक झालेबाबत फिर्यादी यांना समजले.
त्याबाबत त्यांनी व्यवसायिकांकडून अधिक माहिती घेतली असता संबंधित व्यक्तीने अशाच प्रकारे बऱ्याच लोकांची फसवणूक केल्याचे खात्रीशीर समजलेवर फिर्यादी यांनी सातारा शहर पोलीस ठाणेत उन्मेश उल्हास शिर्के (रा. निरा) याचे विरुद्ध तक्रार दिली.
सदर फिर्यादीवरून प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने व सामान्य नागरिकांची याप्रकारे मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आल्याने पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे, सहा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी सातारा शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे डी. बी. पथकातील पो. उपनिरीक्षक समीर कदम यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्याप्रमाणे डी. बी. पथकाने संबंधित संशयित आरोपीची तात्काळ माहिती प्राप्त करून एकास मुंबई व एकास पुणे येथून पाठलाग करून ताब्यात घेतले.
त्यांचेकडे प्राथमिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली की, सदर दोन संशयित आरोपींनी सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, गुजरात अशा विविध तून अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे समोर आले.