वेदांत जाधव शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावा


दैनिक स्थैर्य । दि.०९ जानेवारी २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चि.वेदांत विक्रम जाधव याने राज्य गुणवत्ता यादीत ३०० पैकी २७६ गुण मिळवत १०वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. या त्याच्या यशात श्री क्लासेस चे श्रीकांत साळुंखे सर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्याच्या पालकांनी नमूद केले. तो जि.प प्रा.शाळा-टाकळवाडे च्या उपशिक्षिका सौ. अश्विनी जाधव व आर्किटेक्ट विक्रम जाधव यांचा सुपुत्र आहे.त्याच्या या यशाबद्दल पिंपरद केंद्रातील सर्व शिक्षक समूहाने त्याचे अभिनंदन केले आहे.

Back to top button
Don`t copy text!