दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२३ | फलटण |
श्री स्वामी समर्थ महाराजांचा १६७ वा प्रकट दिन गुरुवार, दि.२३ मार्च रोजी संपन्न होत असून यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरीप्रणीत) मलटण, ता. फलटण येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रकट दिनानिमित्त गुरुवार, २३ मार्च रोजी सकाळी ४.३० ते ६.०० वाजेदरम्यान श्री स्वामी समर्थ महाराज सामुदायिक अभिषेक, त्यानंतर सकाळी ८.०० वाजता भूपाळी आरती, सकाळी १०.३० वाजता डब्यातील एकत्र केलेले पाच नैवेद्य गोपाल काला आरती, सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान सामूहिक श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण, दुपारी १.०० ते २.३० वाजता मंदीयाळी (भोजन), सायं. ४.०० ते ५.३० वाजेदरम्यान बारा सणांची मांडणी, संध्याकाळी ६.०० ते ७.०० वाजता महानैवेद्य आरती, संध्याकाळी ७.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेऊन सर्व सेवेकर्यांनी प्रसादाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.