जयदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त योद्धा स्पोर्टस् क्लबतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२४ | बारामती |
युवा नेते जयदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त योद्धा स्पोर्टस् क्लब व ऑल पुणे ग्रामीण पिंच्याक सिलाट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यनगरीमध्ये राष्ट्रीय पिंच्याक सिलाट निवड चाचणी, एकदिवसीय बेल्ट परीक्षा आणि एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये सूर्यनगरी व बारामती परिसरातील १०० मुलांनी सहभाग घेतला व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. या निवड चाचणीतील १०० पैकी ३० मुलांची निवड नांदेड या ठिकाणी होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
.
या स्पर्धेचे उदघाट्न पुणे जिल्हा सरसिटणीस राष्ट्रवादी पार्टीचे प्रा. अजिनाथ चौधर यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा ग्रँडमास्टर आनंदकर, राष्ट्रवादी काँग्रेस श्रीगोंदा तालुकाध्यक्ष श्री. जयश आनंदकर व योद्धा स्पोर्टस् अकॅडमीचे संस्थापक साहेबराव ओहोळ यांच्या उपस्थितीत पार पडली.

योद्धा स्पोर्टस् क्लब बारामती व सूर्यनगरी परिसरात खेळाचा विस्तार अतिशय प्रामाणिकपणे आणि उत्साहाने करत आहे. तसेच बारामतीच्या मुलांना शासकीय मान्यतेचे खेळ देत आहे. येणार्‍या काळात आपल्या बारामतीचे खेळाडू नक्कीच ऑलम्पिक लेवलच्या स्पर्धा खेळतील, अशी अपेक्षा प्रा. अजिनाथ चौधर यांनी व्यक्त केली.

बारामती ते काटेवाडी सायकल रॅली, रक्तदान शिबिर व राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती योद्धा स्पोर्टस् अकॅडमीचे संस्थापक साहेबराव ओहोळ यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!