
स्थैर्य, फलटण, दि.10 नोव्हेंबर : कापशी ता. फलटण येथील जागृत देवस्थान, ग्रामदैवत श्री. भैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरामध्ये श्री कालभैरवनाथ जयंतीनिमित्त मंगळवार दि. 11 नोव्हेंबर ते गुरुवार दि. 13 नोव्हेंबर या दरम्यान अभिषेक, होमहवन, तसेच कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कालभैरव जन्मोत्सवानिमित्त बुधवार दि. 12 रोजी सकाळी नऊ वाजता ह. भ. प. माधुरीताई पवार यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दुपारी तीन वाजता भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री आठ वाजता भैरवनाथ व माता जोगेश्वरीदेवीची आरती होईल. रात्री साठे आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री नऊ वाजता झी टॉकीज फेम ह. भ. प. संकेत महाराज यादव यांची कीर्तन होणार आहे. गुरुवार दि. 13 रोजी सकाळी सात वाजता श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांची पालखीमधून ग्रामप्रदक्षिणा होणार आहे. रात्री आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री भैरवनाथ देवस्थानचे पुजारी व मानकरी मिलिंद बोबडे यांनी केले आहे.

