श्री सद्गुरू सेवागिरी महाराज मंदिरात गुरुपौणिमेनिमित्त विविध कार्यक्रम


दैनिक स्थैर्य । 9 जुलै 2025 । फलटण । पुसेगांव येथील श्री सद्गुरू सेवागिरी महाराज मंदिरात होणार गुरूपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने गुरुवार दि. 10 रोजी पहाटे 5 ते 7 प. पू. सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची महापुजा होणार आहे.

सकाळी 10 वाजता सद्गुरू श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे मठाधिपती प.पू. सुंदरगिरी महाराज यांच्याहस्ते इच्छुक भाविकांना अनुग्रह दिला जाईल.

दुपारी 12 ते 12/30 आरती दुपारी 1 वाजता ज्येष्ठ उद्योजक हनुमंतराव वामनराव मोहिते यांच्यावतीने अन्नदान होणार आहे.

दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत जरेवाडी भजन मंडळाचे यांचे भजन होणार आहे. रात्री 9 ते 11 पुसेगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सेवागिरी महाराज देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!