
दैनिक स्थैर्य । 25 मार्च 2025। फलटण । अहिल्यानगर गजानन चौक येथील स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा 169 व्या प्रकट दिन व गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 30 रोजी पहाटे 5.30 वाजता श्रींच्या मूर्तीस अभिषेक, सकाळी 7.30 ते 8 वाजेपर्यंत आरती, सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. दुपारी 3 ते 5 या वेळेत श्री स्वामी याग, सायंकाळी 7.30 ते 8 श्रींची आरती, रात्री 8 ते 11 मोर्वे येथील ॐ दत्त ॐ भजनी मंडळाचे भारुड व सोंगाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि. 31 रोजी पहाटे 5.30 वाजता श्रींच्या मूर्तीस अभिषेक, सकाळी 7.30 ते 8 वाजेपर्यंत आरती,
सकाळी 9 ते 6 या वेळेत रक्तदान शिबीर, सकाळी 10 ते 12 सद्गुरु हरिबाबा सांप्रदायिक भजनी मंडळाचा कार्यक्रम, दुपारी 12.30 ते 1 श्रींची महाआरती, दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी 5 ते 7 ॐ दत्त चिले भजनी मंडळ फलटण यांचा कार्यक्रम, सायंकाळी 7.30 ते 8 श्रींची महाआरती, रात्री 8 ते 9 महाप्रसाद वाटप, रात्री 10 ते 12 श्री स्वामी समर्थ एकतारी भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, 24 ते 30 मार्च दरम्यान दररोज सकाळी 10 ते 11.30 यावेळेत श्री स्वामी समर्थ सारांमृत ग्रंथाचे वाचन होणार आहे. रक्तदान शिबीरात सर्वांनी सहभागी होण्यासाठी संजय चोरमले मोबा. 9405590976, सौरभ बिचुकले 9637294247. कुणाल वाघ 7887838970, प्रसाद दळवी 9860732038 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.