गुढीपाडव्याला  पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिरात विविध कार्यक्रम


स्थैर्य, 18 मार्च, सातारा : चैत्र शु. प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नूतन वर्ष सुरुवात गुरुवार दि. 19 रोजी नूतन वर्ष स्वागताला पंचपाळी हौद दुर्गा माता  मंदिरामध्ये आपण कार्यक्रम आयोजित केले आहेत,यामध्ये सकाळी ०६ वा. देवीला सुगंधी द्रव्य व फळांच्या रसाच्या महाअभिषेक,सकाळी 7.00  वा. गुढी उभारणे,सायंकाळी ०७ वा. *दीपोत्सव व महाआरती,सायंकाळी ०७:३० वा. नूतन वर्षाच्या स्वागताला फटाक्यांची आतिषबाजी याशिवाय मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात येईल.
सर्व दुर्गा भक्तांना येणाऱ्या नूतन मराठी  वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आल्या असून या सर्व कार्यक्रमांना सातारकर भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.गुढीपाडव्यानिमित्त मंदिराला विशेष आकर्षक अशी विद्युत रोषणाई ही करण्यात आली असून ही सजावट पाहण्यासाठी सातारकरांनी गुढीपाडव्याला दिवसा आणि रात्रीही भेट द्यावी आणि आनंद लुटावा असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!