लक्ष्मीनगर येथील नवग्रह मंदिरात २२ जानेवारीला विविध कार्यक्रम


दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण |
येणार्‍या पौष मासातील शु. द्वादशी, विक्रम सवंत् २०८०, २२ जानेवारी २०२४, सोमवार या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामाची बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे.

यानिमित्ताने फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथे असणार्‍या नवग्रह मंदिरामध्ये सायंकाळी दिव्यांची उजळण, दिव्यांच्या माळा, भजन, श्री. येवले सर यांचे श्री प्रभू श्रीराम या विषयावर व्याख्यान व त्यानंतर महाप्रसाद इ. कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

या दिवशी सायंकाळी ५.३० ते ७ भजन, सायंकाळी ७ ते ८ श्री. येवले सर यांचे व्याख्यान आणि कार सेवकांचा सत्कार, रात्री ८ ते ८.१५ महाआरती व अक्षदा वाहने कार्यक्रम, रात्री ८.१५ नंतर शिखर भूमीपूजन व महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा, अशी विनंती आयोजक सौ. आनंदी तरटे, सौ. नयना जाधव, सौ. हर्षदा कोरडे, सौ. स्वाती गारुळे, कु. नुपूर ज्योतेंवार, सौ. अश्विनी यादव, सौ. अंकिता कराड, सौ. अडकर, श्री. चंद्रशेखर जाधव, श्री. सचिन कोरडे, श्री. तेजस भोंगळे, श्री. अनिल पवार, श्रीराम कराड, श्री. यादव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!