वडले गावासाठी विविध विकासकामे मंजूर; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश

दुधेबावी टाकीचा मळा ते वडले हद्दीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचा समावेश; रणजित सोनवलकर यांनी मानले आभार


स्थैर्य, वडले, दि. ३० ऑगस्ट : फलटण तालुक्यातील वडले गावासाठी विविध विकासकामे मंजूर झाली असून, यामध्ये दुधेबावी टाकीचा मळा ते वडले गावच्या हद्दीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा समावेश आहे. या विकासकामांसाठी विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल गावचे नेते श्री. रणजित सोनवलकर यांनी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.

वडले गावातील रस्त्याची दुरवस्था झाली होती, ज्यामुळे ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. ही समस्या लक्षात घेऊन, श्री. रणजित सोनवलकर यांनी वरील नेत्यांकडे रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला आणि नेत्यांच्या सकारात्मक प्रतिसादाला यश आले असून, आता लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

या विकासकामामुळे गावातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य करणाऱ्या सर्व नेत्यांचे आम्ही ऋणी आहोत, अशी भावना श्री. सोनवलकर यांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!