महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 30 मार्च 2025। फलटण । येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता सावता माळी महाराज मंदिर, नाना पाटील चौक याठिकाणी चित्रकला व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

या स्पर्धेत महात्मा फुले किंवा सावित्रीमाई फुले चित्र रेखाटन किंवा स्केच काढावयाचे आहे. या स्पर्धा 1 ली ते 5 वी, व 6 वी ते 10 वी तसेच खुल्या गटात होणार आहे.

मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या निबंध स्पर्धेत स्पर्धकांनी महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या कार्यावरती निबंध लिहावयाचा आहे. या स्पर्धा 4 थी ते 7 वी, 8वी ते 10 वी व खुल्या गटात होणार आहे.

प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक बक्षीस दिले जाणार आहे.

स्पर्धेसाठी लागणारे कागद आयोजकाकडून दिले जाणार आहेत. स्पर्धकांनी रंग घेऊन येणे आवश्यक आहे.

या स्पर्धेमध्ये भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांनी खालील लिंक वरती नोंद करणे गरजेचे आहे.

नाव नोंदणी लिंक पुढीलप्रमाणे – https://docs.google.com/forms/d/e/1F-IpQLSejyO8J67hqNU1lTev

या स्पर्धेसाठी सोमवार दि. 31 मार्च पर्यंत नोंदणी करणे आवश्यक स्पर्धेचा निकाल गुरुवार दि. 10 एप्रिल जाहीर करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!