
स्थैर्य, 26 मार्च, सातारा : जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, ग्रंथालये यांना दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. महात्मा फुले आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्काराने येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाचे संचालक डॉ. राजेंद्र माने यांना सन्मानित केले जाणार आहे.
पुरस्कार वितरण पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेज येथे रविवारी (ता. 29) होणार आहे. त्यावेळी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, पदाधिकारी, अमरसिंह पाटणकर, लेखक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार
लवटे, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथालय कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे, समाजात वाचन संस्कृती वाढावी, यासाठी कार्य करणार्या व्यक्ती आणि वाचनालयांना या अंतर्गत गौरव केला जातो. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामीण ग्रंथालय पुरस्कार सुरुची महिला ग्रंथालय, सोमवार पेठ, कर्हाड, जे. एस. जाधव सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, सणबूर (ता. पाटण), महिला सार्वजनिक वाचनालय, खोजेवाडी (ता. सातारा) यांना जाहीर झाला आहे.
(कै.) विष्णू जाधव व (कै.)भाऊसाहेब नलावडे स्मृतिप्रीत्यर्थ सेवाव्रती पुरस्काराने पाटण येथील कोयना एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर यांना सन्मानित केले जाणार आहे. दादासाहेब रा. पाटील स्मृतिप्रीत्यर्थ कृतज्ञता पुरस्कार रोहित शिंदे (सिरम इन्स्टिट्यूट, पुणे) यांना, महात्मा फुले आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार डॉ. राजेंद्र माने (सातारा), डॉ. एस. आर. रंगनाथन आदर्श ग्रंथपाल पुरस्कार महेश दाजी कदम (श्रीपाद मोफत वाचनालय, चाफोली रोड, पाटण) यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार उमा दत्तात्रय सावंत (सहाय्यक ग्रंथपाल, हिंद नगरवाचनालय व ग्रंथालय रहिमतपूर), ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण स्मृती पुरस्कार वाई येथील प्रा. बाळासाहेब कोकरे यांना, प्रा. भास्करराव माने स्मृतिप्रीत्यर्थ ग्रंथभास्कर पुरस्कार लेखिका डॉ. आदिती काळमेख यांना, (कै.) यमुनाबाई सावंत व श्रीहरी सावंत स्मृतिप्रीत्यर्थ मातृ-पितृ वंदना पुरस्कार लीलावती हणमंतराव पोळ (कवठे, ता. वाई) यांना, बाबूराव शेटे पुरस्कृत ग्रंथपाल विठ्ठलराव पाटील स्मृती पुरस्कार शिरवळ येथील श्री रामदास मोफत वाचनालयाचे ग्रंथपाल अकबर निजाम काझी यांना डॉ. विनायकराव गायकवाड स्मृतिप्रीत्यर्थ ग्रंथसोबती पुरस्कार नंदकुमार सावंत यांनाँ जाहीर झाला आहे.
