स्थैर्य, सातारा, दि.११: NULM , सातारा नगरपरिषद अंतर्गत जागतीक बेघर दिना निमित्त दिनांक 6 आॅक्टोबर ते १० आॅक्टोबर अखेर विविध उपक्रम राबविण्यात आले.या मध्ये निर्मिती वस्तीस्तर संघा मार्फत निवारा केंद्रातील बंधू भगिनींना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच निवारा केंद्रामध्रे वृक्षारोपण ,निवा-याचे सॅनिटायझेशन , आरोग्य तपासणी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.जागतिक बेघर दिना निमित्त खुल्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
आज बेघर दिनाच्या प्रसंगी निवा-याचे नामकरण आस्था बेघर निवारा केंद्र असे करण्यात आले. नगरपरिषदेच्या अध्यक्षा मा.माधवी कदम यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.सर्व वस्तीस्तर संघांच्या वतीने निवा-यातील बंधू भगिनींना नवीन कपडे देण्यात आले.निवा-या मधील व्यवस्थापक,संतोष राठोड, काळजी वाहक उमेश पतंगे व मोहिनी पतंगे यांचा या निमित्ताने इनरव्हिल क्लब सातारा कॅम्प यांच्या वतीने विशेष सत्कार क्लबच्या अध्यक्षा प्रज्ञा माने व सेक्रेटरी संगीता लोया यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी निबंध स्पर्धे मधील प्रथम क्रमाक वर्षा हेमंत आवडे ,द्वितीय क्रमांक समिक्षा संतोष यादव व तृतिय क्रमांक निखील अशोक कडकोळ यांना यशोधन चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रवि बोडके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला सातारा नगरपरिषदेच्या अध्यक्षा माधवी कदम, नगरसेविका स्नेहा नलवडे,इनरव्हील क्लब सातारा कॅंम्पच्या अध्यक्षा प्रज्ञा माने सेक्रेटरी संगीता लोया, NULM चे व्यवस्थापक कीर्ति साळुंखे,राजेंद्र दिवेकर, समुह संघटक आरती जोशी,यशोधन चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रवि बोडके, वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा सुवर्णा कडकोळ,कमल माळी,निवाराचे संतोष राठोड,उमेश पतंगे,मोहिनी पतंगे आणि निवा-यातील बंधु भगिनी उपस्थित होते.