दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२२ । पंढरपूर । पै. पांडुरंग तात्या माने यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त अंध शाळा, सुखुबाई कन्या प्रशाला, येथे मिष्ठांन्न भोजन देण्यात आले. व अंगणवाडी मध्ये लहान मुलांना खुडची व खाऊ वाटप अशी माहिती एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी दिली.
गेले अनेक वर्ष झाले पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशन हे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. कोरोनाच्या च्या काळात सुद्धा पूर्ण पणे फाउंडेशन च्या टीमने कार्य केले आहे. व अनेक विविध उपक्रम राबवत आहेत. आज कै. पांडुरंग तात्या माने यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त फाऊंडेशन च्या वतीने अंध शाळा येथे मिष्ठांन भोजन देण्यात आले व गोटू परचंडे च्या वतीने कोळी गल्लीतील अंगणवाडी क्रमांक 56 मध्ये लहान मुलांना बसण्यासाठी खुडची व खाऊ चे वाटप करण्यात आले. व सखुबाई कन्या प्रशाला येथे गणेश माने यांच्या वतीने ही मिष्ठांन भोजन देण्यात आले.
यावेळी संस्थापक निलेश माने हे बोलताना म्हणाले की व्हायात खर्चाला फाटा देत दुर्लक्षित विद्यार्थ्यांना मदत करा. असे आव्हान पंढरपूरकरांना करण्यात आले.
यावेळी उपस्थित सुरेखाताई माने , निलेश माने, पंढरी संचार संपादक ऋषिकेश बडवे , महेश माने .गणेश माने, विकी अभंगराव , बाबा संगमनेरकर गोटू परचंडे दिनेश माने तम्मा अधटराव मिलिंद काळे शकील मुलानी संकेत श्रीखंडे तेजस अभंग समाधान अभंगराव ज्ञानेश्वर सावंत सर ज्ञानेश्वर कांबळे लखन बागडे इत्यादी उपस्थित होते.