वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष सपना भोसले यांनी घेतला स्वच्छता मोहिमेत सहभाग


दैनिक स्थैर्य । दि. २० सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण येथे फलटण नगर परिषद फलटण येथे वाढत असलेल्या साथीच्या आजाराच्या संदर्भात व डेंगू सारख्या भयानक आजारावरती मात करण्यासाठी करत असलेले प्रयत्न व नागरिकांना केलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरामध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष सपना भोसले यांनी उस्पूर्त सहभाग घेतला.आपल्या परिसरातील स्वच्छता, आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी परिसरातील ओला व सुखा कचरा, त्याचबरोबर घरावरील पाण्याच्या टाक्या खाली करून अथवा त्यावर झाकण लावून ठेवल्यास आपण डेंगू सारख्या आजाराला लांब ठेवू शकतो असे त्यांनी नागरिकांना आव्हान केले.फलटण शहरांमध्ये सर्वपक्षीय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष सपना भोसले आपल्या कार्यकर्त्यांसह शामिल झाल्या. फलटणकारांच्या आरोग्यासाठी या स्वच्छते मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी नागरिकांना केले.


Back to top button
Don`t copy text!