शाहू बोर्डिंगसाठी लक्ष्मी फंडाला मोलाची मदत

पालकांनी जमवले तब्बल ५९ हजार रुपये; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक


स्थैर्य, 18 मार्च, सातारा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले राहात असलेल्या शाहू बोर्डिंगसाठी रा. ब. काळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी लक्ष्मी. फंडासाठी मोलाची मदत केली असून, त्यांनी तब्बल ५९, २०९ रुपयांचा लक्ष्मी फंड उभा केला आहे.या बोर्डिंगला शासनाचे कोणतेही अनुदान मिळत नाही. या बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांना कशाचीही कमी भासू नये म्हणून रा. ब. काळे शाळेत शाहू बोर्डिंगमधील विद्यार्थी देखील शिक्षणघेत आहेत. या विद्यार्थ्यांप्रति अनोखी कणव शाळेतील पालकांनी दाखवली आहे.
मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांनी पालकांना शाहू बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक मदत जमा करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देताना पालकांनी भरभरून मदत केली. जमा झालेली मदत शाहू बोर्डिंगला देण्यात येणार आहे.शून्य खर्चाचे स्नेहसंमेलन ही संकल्पना राबवून पालकांचा स्नेहसंमेलनावर होणारा खर्च शून्य केला.
वाचलेल्या पैशातून पालकांनी उत्स्फूर्तपणे लक्ष्मी फंडासाठी मदत केली. चार वर्षांत मिळून तब्बल दोन लाख ३० हजार इतका निधी पालकांच्या माध्यमातून उभा राहिला आहे. या उपक्रमात उपशिक्षिका माधुरी भोईटे, आशा वाघमोडे, वर्षा भोसले, ज्योती ढमाळ, विजय माने, श्वेता शिंदे, श्रेया शेडगे आदी शिक्षक सहभागी झाले आहेत. रा. ब. काळे शाळेतील पालकांनी शाहू बोर्डिंगमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!