दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । सातारा । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ सातारा च्या अध्यक्षपदी वैदेही रामचंद्र देव यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. अशा रीतीने ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी प्रथमच एका महिलेची निवड झाल्याने सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त केला. कार्याध्यक्ष म्हणून
सुजित शेख यांची निवड करण्यात आली आहे तर कार्यवाह म्हणून विजय मांडके यांची निवड झाली आहे
जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून असलेले प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांनी कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. या सर्व निवडी एकमताने करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक संघ साताराचे निवडून आलेले अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे. – उपाध्यक्ष- भिकाजीराव नाथाजीराव सूर्यवंशी , सहकार्यवाह- अशोक कानिटकर ,कोषाध्यक्ष – मदनलाल देवी.
वार्षिक सभेमध्ये निधन झालेल्या डॉ बाळासाहेब माजगावकर , डॉ मंगलाताई माजगावकर , रामभाऊ जाधव , सुधीर धुमाळ , वाय.के. कुलकर्णी , नानासाहेब द्रविड , सदाशिवराव कारळे , पांडुरंग खटावकर , नीलिमा देशपांडे , आदिंच्या कार्याचा गौरव करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेच्या जमा-खर्चाचा ताळेबंद पत्रक आस मंजुरी देण्यात आली तसेच २०२१- २०२२ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली मागील वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि आगामी वर्षाच्या कार्याची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ , विद्याताई आगाशे , प्रा. अविनाश लेवे , सुरेश कुलकर्णी , मदनलाल देवी , भिकाजीराव सूर्यवंशी आदींची भाषणे झाली. यावेळी नूतन अध्यक्ष वैदेही देव यांचे पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. सर्वांना विश्वासात घेऊन या पुढे ज्येष्ठ नागरिक संघ सातारा चे काम अधिक गतीने करण्यात येईल असे यावेळी कार्याध्यक्ष सुजित शेख व कार्यवाह विजय मांडके यांनी सांगितले. वार्षिक सभेस अनेक ज्येष्ठ नागरिक सभासद उपस्थित होते.