वडूज पोलिसांच्या धडक कारवाया – एकीकडे दारू अड्ड्यावर छापा तर दुसरीकडे खुनातील फरारी महिला आरोपी पकडली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, खटाव, दि.२९: खटाव तालुक्यातील कलेढोण जवळील गारळे वाडी येथील जिरपी नावाच्या शिवारात कालिदास अरुण बुधावले याच्या वडिलांचे घरात बेकायदेशीर दारू विकत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांना मिळाली असता, उपविभागीय पोलीस कार्यालयातील पथकाने छापा टाकून कालिदास बुधावले याच्याकडे आढळलेल्या देशी दारूच्या १६ बॉक्स मध्ये ७६८ बाटल्या हस्तगत केल्या असून याची किंमत ४० हजार आहे.सदर आरोपी वर वडूज पोलीस ठाण्यात ३४५/२०२० महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई अमोल माने,राम तांबे, तानाजी चंदनशिवे, रमेश बर्गे,अनिल वाघमोडे, सुहास गाडे यांच्या पथकाने केली असून पोलीस कॉन्स्टेबल खांडेकर अधिक तपास करत आहेत.

दुसऱ्या गुन्ह्यात वडूज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर

नंबर ४३४/२०१८ कलम ३०२,३४ मधील दोन वर्षांपासून फरार असलेली आरोपी महिला गौरी नाज्या भोसले(पारधी) ही सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथून सातारा जिल्ह्यातील कातर खटाव येथील पारधी वस्तीत येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या पथकाला मिळाली असता, या पथकाने त्या आरोपी महिलेस ताब्यात घेतले. ही महिला दोन वर्षांपूर्वी येथील एका झोपडपट्टीत राहत असता, तिच्या घरातच राहणाऱ्या एका इसमाचा,वारंवार त्रास देत असल्याचे कारणावरून पती व सासू च्या मदतीने खून करण्यात आला होता.

पोलीस हवालदार धनाजी वायदंडे,प्रियांका पवार, तानाजी चंदनशिवे, रमेश बर्गे, अनिल वाघमोडे या पथकाने तिला पकडण्यात यश मिळवले असून वडूज पोलिसांच्या धडक कारवायाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खटाव माण तालुक्यात अवैध धंदे, दहशत माजवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाई करणार-डी वाय एस पी डॉ निलेश देशमुख


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!