
वडले येथील अक्षय नाना सोनवलकर मित्र समूहासह शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
स्थैर्य, वडले (फलटण), दि. १३ जानेवारी : फलटण तालुक्यातील वडले येथील अक्षय नाना सोनवलकर मित्र समूहासह शेकडो कार्यकर्त्यांनी राजे गटातून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला असून, यामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये भाजपला बळकटी मिळाल्याचे चित्र आहे.
वडले गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या अक्षय नाना सोनवलकर मित्र समूहाने सामूहिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या प्रवेशात अजिंक्य सोनवलकर पाटील, संदेश सोनवलकर, हिम्मत नरुटे, शिवतेज पवार, प्रणय माने, गणेश घनवट, ओमकार दळवी, अविनाश सोनवलकर, किरण सोनवलकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
या सामूहिक प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद वडले व परिसरात वाढल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात पक्षवाढीसाठी नव्याने प्रवेश केलेले कार्यकर्ते सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

