व्हॅक्सीन ट्रॅकर : सीरमचा दावा- कोवीशील्ड सेफ आणि इम्युनोजेनिक; या तारखेपर्यंत देणार लस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१: भारतात ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी
आणि एस्ट्राजेनेकाची व्हॅक्सीन, कोवीशील्डचे ट्रायल करणाऱ्या सीरम
इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ने चेन्नईच्या घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे.
सीरमने म्हटले की, त्यांची व्हॅक्सीन सेफ आणि इम्युनोजेनिक आहे. सीरमला हे
स्पष्टीकरण यासाठी द्यावे लागले, कारण चेन्नईमध्ये ट्रायल्समध्ये सामील
झालेल्या एका वॉलेंटियरने न्यूरोलॉजिकल समस्या होत असल्याचा आरोप केला
होता.

तिकडे, केंद्र सरकारने
पुढील जुलै-ऑगस्टपर्यंत 30 कोटी नागरिकांना कोरोना व्हॅक्सीन देण्याची
योजना आखली आहे. तर, केरळ सरकारने आपल्या स्तरावर व्हॅक्सीन बनवण्यासाठी
हाय लेव्हल कमेटीची स्थापना केली आहे. अमेरिकेतही व्हॅक्सीनबाबत महत्वाच्या
डेव्हलपमेंट्स झाल्या आहेत. फायजरनंतर मॉडर्नानेही इमरजेंसी अप्रूव्हलसाठी
परवानगी मागितली आहे.

चेन्नईच्या घटनेवर सीरमचे स्पष्टीकरण

सीरम
इंस्टीट्यूटने सोशल मीडियावरुन दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले की,
कोवीशील्ड पूर्णपणे सेफ आणि इम्युनोजेनिक आहे. चेन्नईणध्ये वॉलेंटियरसोबत
जे झाले, ते दुःखद आहे. पण, त्याला जे काही झाले, त्याचा व्हॅक्सीनशी संबंध
नाही. आम्ही सांगू इच्छितो की, सर्व रेगुलेटरी आणि एथिकल प्रोसेसेज आणि
गाइडलाइंसचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. या घटनेची माहिती संबंधित
अथॉरिटी, प्रिंसिपल इन्वेस्टिगेटर, DSMB आणि एथिक्स कमेटीला दिली आहे. या
घटनेशी संबंधित डेडा DCGI लाही देण्यात आला आहे.

आम्ही
सर्वांना खात्री देतो की, जोपर्यंत व्हॅक्सीन इम्युनोजेनिक सुरक्षित सिद्ध
होत नाही, तोपर्यंत लस नागरिकांना दिली जाणार नाही. व्हॅक्सीनेशन आणि
इम्युनायजेशनबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. त्या लक्षात ठेऊन आणि कंपनीची
इमेज पाहता आरोप लावणाऱ्या वॉलेंटियरविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार
आहोत.

भारतात पुढच्या वर्षी लसीकरणाला सुरुवात

केंद्रीय
आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले की, पुढच्या वर्षीच्या
सुरुवातीच्या 3-4 महिन्यात आम्ही व्हॅक्सीनचा पुरवठा सुरू करू. जुलै-ऑगस्ट
2021 पर्यंत आम्ही 25-30 कोटी नागरिकांना व्हॅक्सीन देण्याची योजना आखली
आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करत आहोत. जोपर्यंत व्हॅक्सीन उपलब्ध होत
नाही, तोपर्यंत मास्कच आपले व्हॅक्सीन आहे.

राज्यांना निर्देश- कोविन अॅपवर आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा अपलोड करा

केंद्रीय
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19
व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क (COVIN) वर आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा अपलोड
करण्याचे निर्देश दिले आहेत. या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रायोरिटी बेसिसवर
कोरोना व्हॅक्सीन दिली जाणार आहे. कोविन अॅपला केंद्र सरकारने डेव्हलप केले
आहे आणि ही व्हॅक्सीन रोलआउट प्लॅनमध्ये महत्वाची भूमिका निभावणारी आहे.
व्हॅक्सीनची खरेदी, डिस्ट्रीब्यूशन, सर्कुलेशन, स्टोरेज आणि डोज शेड्यूलची
डिटेल कोविन अॅपवर असेल. केंद्र सरकारच्या योजनेनुसार, MBBS डॉक्टर, BDS
डॉक्टर, स्टाफ नर्स (B.Sc नर्सिंग), सहायक नर्स (GNM, ANM आदि),
फार्मासिस्ट, MBBS इंटर्न आणि BDS इंटर्नलाही व्हॅक्सीन लावण्याची ट्रेनिंग
दिली जाईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!