दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । पुणे । समाज माध्यमाचा निवडणूक जनजागृती कामकाजात प्रभावीपणे वापर करण्याचा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयोजित समाज माध्यम कार्यशाळेच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मृणालिनी सावंत आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, समाज माध्यमाच्या माध्यमातून नागरिकांना पर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोहचविण्यात यावी. संदेश अधिक प्रभावी ठरण्यासाठी ट्विटर वर कमी शब्दात आकर्षक मजकूर पोस्ट करा. समाज माध्यमे दैनंदिन वापर करुन अद्यावत ठेवा. समाज माध्यमे काळजीपूर्वक हाताळा. जिल्हानिहाय समाज माध्यमांचे गट करुन माहितीचे आदान प्रदान करत रहा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
माध्यम कार्यशाळेत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर पोस्ट करण्याविषयी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.