यूएस ओपन : थिएम यूएस ओपनचा चॅम्पियन; ग्रँडस्लॅम किताब जिंकणारा 150 वा खेळाडू


 

स्थैर्य, न्यूयॉर्क, दि.१५: ऑस्ट्रियाचा टेनिसपटू डाेमिनिक थिएम यंंदाच्या अमेरिकन आेपनमध्ये चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीच्या किताबावर नाव काेरले. या २७ वर्षीय टेनिसपटूने फायनलमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला पराभूत केले. यासाठी त्याला चार तास दाेन मिनिटे पाच सेटपर्यंत शर्थीची झंुज द्यावी लागली. मात्र, त्याने सरस खेळी करताना २-६, ४-६, ६-४, ६-३, ७-६ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. सुरुवातीच्या दाेन्ही सेटमधील अपयशातून सावरताना त्याने हा थरारक विजय मिळवला आहे. अशा प्रकारे सुरुवातीचे दाेन सेट गमावूनही या स्पर्धेची फायनल जिंकणारा हा पहिला खेळाडू ठरला.

त्याला करिअरमध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवता आला. त्याने यापूर्वी तीन वेळा ग्रँडस्लॅमसाठी फायनल गाठली. मात्र, त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. थिएमच्या रूपाने ऑस्ट्रियाला पहिला ग्रँडस्लॅम किताब विजेता टेनिसपटू मिळाला आहे. ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेणारा थिएम हा १५० वा टेनिसपटू ठरला.

सहा वर्षांत ग्रँडस्लॅम किताब जिंकणारा थिएम पहिला :

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या थिएमने पुुरुष एकेरीचा किताब पटकावला. अशा प्रकारे सहा वर्षांत ग्रँडस्लॅम किताब जिंकणारा ताे पहिला टेनिसपटू ठरला.यापूर्वी २०१४ मध्ये क्राेएशियाच्या मरीन सिलिचने हा पराक्रम गाजवला हाेता. सिलिचने फायनलमध्ये निशिकाेरीवर मात करून यूएस आेपनची ट्राॅफी पटकावली हाेती.

कदाचित….आज दाेन विजेते असते

या राेमहर्षक विजयावर माझा विश्वासच बसत नाही. मात्र, मी हा एेतिहासिक विजय संपादन केला. ज्वेरेवसाेबत माझी २०१४ पासून चांगली मैत्री आहे. ताे एक चांगला प्रतिस्पर्धी आहे. आमची काेर्टवर आणि काेर्टच्या बाहेरील मैत्री अधिक दृढ आहे. त्यामुळे मला त्याच्याविरुद्ध खेळताना आनंद वाटला. -डोमिनिक थिएम, विजयानंतर


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!