काका मोमीन गेला , भावपूर्ण श्रद्धांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.१५: सिराजुद्दीन बाबालाल मोमीन. आम्ही त्याला काका म्हणत असू. काल मला तो ११ सप्टेंबरला कोरोनामुळे गेल्याचे समजले आणि मन अस्वस्थ झाले. सातारच्या समाजवादी युवक दलापासून त्याला मी एक सहकारी कार्यकर्ता म्हणून संबंधित होतो. कविमनाचा आणि संवेदनशील असा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे . खरंतर त्याला पदवीधर असूनही केवळ मुस्लिम म्हणून त्यावेळच्या युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरी दिली गेली नाही. हे त्याचे आणि आपल्यासारख्या सर्वांचेच दुर्दैव. आमचे चळवळीतले जेष्ठ सहकारी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यासंदर्भात नेहमी इतरांना उदाहरण देत असत. त्याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळवली. मुळचा तो सातारा तालुक्यातील निनाम पाडळी येथील पण सातारयातच राहायचा. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधून त्याने आपली सेवा बजावली. रयत शिक्षण संस्थेमधुन सेवानिवृत्त झाले नंतर तो कुटुंबियांसमवेत करायलाच रहात होता. 

कराड नगरपालिकेने स्वच्छता अभियानासाठी घंटागाड्या वापरलेले आहेत त्या घंटा गाड्यांवर सकाळी सकाळी प्रत्येक गाडीवर ” जे ओला कचरा , सुका कचरा , वेगवेगळा करू चला “असे स्वच्छता मोहिमेचे गीत ऐकायला येते. त्या गिताची रचना सन्मित्र काका यांचीच आहे. काकाचा मृत्यू मनाला वेदना देणारा आहे. त्यांनी अनेक कविता लिहिल्या. कवितासंग्रह सुध्दा प्रकाशित आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर ” *कर्मवीर भाऊराव पाटील निर्माणाचे डोंगर आणि अनवाणी पाय* ” हे पुस्तक लिहिले आहे . कोरोनामुळे तो दवाखान्यात उपचारासाठी दाखल असल्यामुळे त्याला शेवटच्या कालावधीत भेटताही आले नाही. या वेदना सतत मनात डाचत राहतील एवढे नक्की. काका च्या कुटुंबातील त्याची पत्नी , सुनबाई , मुलगा यांचेवरही कोरोनाचे दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यांना लवकर आराम वाटतो याच सदिच्छा.

काका , तुला मनापासून आदरांजली


– विजय मांडके , 

   सातारा


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!