उपजिल्हा रुग्णालयाची नियामक समितीची सभा संपन्न


दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। फलटण । येथील उपजिल्हा रुग्णालयाची नियामक समितीची सभा मंगळवारी उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे होते. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयाला सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.

सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष कदम, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ. प्रविण आगवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंशुमन धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखील दिघे, इंडियन मेडिकल असोसिएशन फलटण अध्यक्ष डॉ.संजय राऊत उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!