स्थैर्य, फलटण, दि.१८: येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ एमजेएफ लायन भोजराज नाईक निंबाळकर यांना लायन डिस्ट्रिक्ट प्रांत मधून द्वितीय उपप्रांतपाल म्हणून बिनविरोध निवडून दिले आहे. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर व पुणे जिल्ह्याचा काही भाग येत असून यामध्ये 64 क्लब अंसर्गत 2500 हून लायन्स सभासद आहेत. ही निवड पुढील दोन वर्षांसाठी असून त्यानंतर सन 2023 – 24 सालाकरता या प्रांताचे प्रांतपाल म्हणून कार्य करण्याची संधी भोजराज नाईक निंबाळकर यांना मिळणार आहे.
या निवडीबद्दल भोजराज नाईक निंबाळकर यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.