सोमवार पासून अनलॉक!! राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली; सातारा जिल्हा तिसऱ्या स्तरामध्ये; सातारा जिल्ह्यात नक्की काय सुरु होणार याचा घेतलेला आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०५ : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख गेल्या काही दिवसांपासून कमी आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार कडून पुन्हा एकदा अनलॉक करण्यात आले आहे. त्यानुसार नवी नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. या स्तरामध्ये सातारा जिल्हा हा तिसऱ्या स्तरामध्ये येत असून नक्की काय सुरु होणार व काय बंद राहणार याचा घेतलेला आढावा

  1. सातारा जिल्ह्यामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व हालचाली ह्या सुरु राहतील
  2. दुकानदार व व्यावसायिकांना आपली आस्थापना हि सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा असेल
  3. सातारा जिल्ह्यामध्ये मॉल, चित्रपटगृहे व नाट्यगृहे हि बंद राहतील
  4. हॉटेल व रेस्टोरंट यांना ५० % क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा असेल त्या नंतर पार्सल व होम डिलिव्हरी देण्यास मुभा आहे
  5. सार्वजनिक स्थळे उदा. ग्राउंड, ओपन स्पेस हि सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल
  6. सर्व खाजगी कार्यालये हि ५० % क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
    विविध खेळांसाठी सकाळी ५ ते सकाळी ९ व सायंकाळी ६ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा
  7. चित्रीकरण करण्यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी असेल
  8. सामाजिक व सांस्कृतिक संमेलनासाठी ५० % क्षमतेने घेण्याची मुभा असेल
  9. लग्न समारंभ हे ५० व्यक्तींच्या उपस्थितीत घेण्याची परवानगी
  10. अंत्यविधीसाठी २० व्यक्तीनांच परवानगी
  11. मिटिंग, नगरपरिषद व पंचायत समिती सर्वसाधारण सभा ह्या ५० % क्षमतेने घेण्याची परवानगी आहे.
  12. बांधकाम व्यावसायिकांसाठी सायंकाळी ४ वाजेपर्यंत काम करण्याची मुभा असेल
  13. शेती व कृषी क्षेत्रासाठी सायंकाळी ४ वाजेपर्यंत काम करण्याची मुभा असेल
  14. ईकॉमर्स सेवा व सुविधा ह्या सुरु ठेवण्यास परवानगी आहे
  15. जिम, सलून, स्पा व वेलनेस सेंटर यांना वातानुकूलित यंत्रणा म्हणजेच AC न लावता सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० % क्षमतेने सुरु ठेवण्यास मुभा
  16. सार्वजनिक वाहतुकीसाठी उभे न राहता पूर्व क्षमतेने सुरु करण्याची परवानगी
  17. कडक निर्बंध असलेल्या जिल्हे वगळून आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी कडक निर्बंध असलेल्या जिल्ह्यांमधून जायचे असेल तर ई-पास आवश्यक
  18. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर सायंकाळी ५ नंतर संचार बंदी असेल

राज्य शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यामध्ये वरील सेवा सुविधा सुरु होवू शकतात तरी या बाबत सातारा जिल्हा प्रशासन नक्की काय निर्णय लागू करतील हे सुद्धा पाहावे लागणार आहे.


Back to top button
Don`t copy text!