स्थैर्य, सातारा, दि. ०५: येथील यादोगोपाळपेठ समर्थ मंदीर परिसरात एकाने दि. 4 रोजी राहत्या घरी हॉलमध्ये छताला गळफास घेवून आत्महत्या केली. धनंजय विष्णु फडतरे वय 47 असे संबंधिताचे नाव आहे. याबाबती माहिती त्यांचे नातलग दिलीप रामचंद्र कडव यांनी शाहूपरी पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस घटनेची नोंद करण्यात आली आहे.