अनधिकृतपणे फ्लेक्सप्रकरणी नगराध्यक्षांच्या पतीवर गुन्हा; कराड शहर पोलिसात पालिकेची तक्रार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२१ । कराड । पालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरात दोन ठिकाणी अनधिकृतपणे बेकायदा फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी नगराध्यक्षांच्या पतीवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद आरोग्य निरीक्षक मिलिंद शिवाजीराव शिंदे (वय 54, रा. शुक्रवार पेठ, कराड) यांनी दिली आहे.

उमेश आनंदराव शिंदे असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहरात वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड, शुभेच्छा फलक लावण्यास बंदी घालण्यात आलेली असताना दि. 2 जुलै 2021 रोजी दुपारी 2.30 ते 4 च्या दरम्यान शहरातील शाहू चौक येथे रस्त्याकडेला व बनपुरकर कॉलनी शनिवार पेठ याठिकाणी कारखान्याच्या अभिनंदनाचे दोन फ्लेक्स उमेश शिंदे यांनी अनधिकृतपणे नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता लावलेचे आढळून आले. याबाबत मुख्याधिकारी यांनी शिंदे यांना नोटीस देऊनही त्यांनी आजअखेर खुलासा दिला नसल्याने सोमवारी उशिरा कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार संदीप पाटील करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!