स्थैर्य, फलटण, दि.१३: महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. संजीवराजेंच्या वाढदिवसानिमित्त फलटण सायकलिंग ग्रुपने फलटण ते पंढरपूर असा एकशे दहा किलोमीटरचा प्रवास करून आरोग्य जपण्याचा अनोखा मंत्र यावेळी संपुर्ण ग्रुपने दिला.
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस दिनांक 9 ऑक्टोबर रोजी प्रतिवर्षी साजरा होत असतो. सध्या कोरोनाने फलटण शहर व तालुक्यामध्ये थैमान घातले आहे. अशा मध्ये कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले होते. यामध्ये फलटण सायकलिंग ग्रुपने श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण ते पंढरपूर रस्ता एकशे दहा किलोमीटरचा सायकलिंग प्रवास करून अनोखा आरोग्य जपण्याचा मंत्र दिलेला आहे.
सध्या कोरोनाने थैमान घातलेले असताना प्रत्येक नागरिकाने आपले आरोग्य जपणे आवश्यक आहे. आरोग्य जपण्यासाठी सायकलिंग हा सर्वोत्तम पर्याय असून प्रत्येकाने सायकलिंग करावे यासाठी अनोखा मंत्र देण्यासाठी फलटण सायकलिंग ग्रुपने फलटण ते पंढरपूर असे सायकलिंग केले व आरोग्य जपण्याचा मंत्र दिला.
फलटण सायकलिंग ग्रुप फलटण ते पंढरपूर हा प्रवास सुरू करण्यासाठी फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून सकाळी चार वाजता पंढरपूरकडे रवाना झाले व दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान ते पंढरपूर येथे पोहचले. पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर त्यांनी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेवुन आमदार प्रशांत परिचारक यांच्याशी बातचीत केली.
यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व फलटण सायकलिंग ग्रुपने आयोजित केलेला हा अनोखा आरोग्य जपण्यासाठीचा उपक्रमाची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली व ग्रुप मध्ये कोण कोण आहे ? तुम्हाला सायकलिंग करताना काही अडचणी वगैरे आली का ? याबाबत त्यांनी सखोल चौकशी फलटण सायकलिंग ग्रुपकडे केली.