दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री श्री.शाह यांचे आगमन होताच मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा श्रीमती वृषाली शिंदे यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. विघ्नहर्त्या गजाननाची सुबक मूर्ती, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.