केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना जयंतीनिमित्त आदरांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२६: केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीना आज त्यांच्या जयंतीदिनी  नवी दिल्ली येथील स्मारकावर जाउन आदरांजली वाहिली.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, परम आदरणीय भारतरत्न अटलजी यांच्या जयंतीनिमित्त ‘सदैव अटल’ या त्यांच्या स्मृतिस्थळी पुष्पांजली अर्पण केली. अटलजीचे विचार आणि देशाच्या विकासाप्रति त्यांचे समर्पण यामुळे आपणास सदैव देशसेवेची प्रेरणा मिळत राहील.

Image

अमित शहा पुढे म्हणाले, “परम आदरणीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना नमन.  त्यांनी विकासाचे  तसेच गरीब कल्याण व भारतातील उत्तम प्रशासन युग सुरू केले. देशासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. अटलजींची कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवा आपल्याला सदैव  प्रेरणा देत राहील. कामाप्रती निष्ठा आणि देशसेवा आपल्याला नेहमीच ध्येयप्राप्तीसाठी प्रेरित करतात.”


Back to top button
Don`t copy text!